आताच शेअर करा

दिनांक: २० मार्च २०२५

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

तळवणे येथील प्रसिध्द पांडवकालीन बटकीची तळी येथे शनिवार दी.२२ मार्च २०२५ रोजी, द्विवार्षिक श्री सत्यनारायण महापुजा आयोजित केली आहे.  या तळीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही तळी जंगलात आहे आणि त्या आजूबाजूचा परिसर पूर्ण तळपाचा भाग असून सुद्धा या तळीच्या पाण्याची पातळी कधीच कधीच कमी होत नाही. बारमाही पाणी असते. गावातील स्थानिकांची गुरे जंगलात चरण्यासाठी सोडली जातात ती सर्व गुरे याच तळीचे पाणी पितात. तळीच्या वरच्या बाजूने एक भले मोठे वडाचे झाड आहे. अनेक वर्षांपूर्वीचे हे वडाचे झाड असून वडाच्या शीतल छायेखाली सर्व गुरे निवांत बसतात. गावापासून दीड ते दोन किलोमीटर दूर डोंगराळ भागात असणारा हा गोठणदेव. जंगलात सोडलेल्या गुरांचा रक्षण करणारा देव म्हणून या देवाला “गोरक्षक गोठणदेव” असे नाव ठेवले गेले.

   जय गणेश कला क्रिडा-मंडळ, तळवणे सुतारवाडीच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सकाळी ९.०० वाजता श्री गोरक्षक गोठणदेवतेचे विधीवत पूजन, दुपारी ३.०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७.०० वाजता सामुदायिक महाआरती व तीर्थप्रसाद, ७.३० वाजल्यापासून महाप्रसाद, रात्री ८.३० वाजता कुपन लकी ड्रॉ (लॉटरी निकाल व बक्षीस वितरण) आदी कार्यक्रम होणार असून त्यानंतर रात्री ९.३० वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ, मळगाव, सावंतवाडी यांचा ‘संत कबीर’ हा ट्रीकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

   भाविकांनी तीर्थप्रसाद,  महाप्रसाद व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय गणेश कला-क्रिडा मंडळ, तळवणे सुतारवाडीच्या वतीने तसेच गावातील स्थानिक ग्रामस्थ्यांकडून करण्यात आले आहे. येथील बटकीची तळी कडील श्री गोरक्षक गोठण देवतेची सत्यनारायण महापूजा

“बटकीची तळी” ही पांडवकालीन  तळी आहे

तळवणे येथील प्रसिध्द पांडवकालीन बटकीची तळी येथे शनिवार दी.२२ मार्च २०२५ रोजी, द्विवार्षिक श्री सत्यनारायण महापुजा आयोजित केली आहे.  या तळीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही तळी जंगलात आहे आणि त्या आजूबाजूचा परिसर पूर्ण तळपाचा भाग आहे.परंतु या तळीच्या पाण्याची पातळी कधीच कधीच कमी होत नाही. बारमाही पाणी असते. गावातील स्थानिकांची गुरे जंगलात चरण्यासाठी सोडली जातात ती सर्व गुरे याच तळीचे पाणी पितात. तळीच्या वरच्या बाजूने एक भले मोठे वडाचे झाड आहे. अनेक वर्षांपूर्वीचे हे वडाचे झाड असून वडाच्या शीतल छायेखाली सर्व गुरे निवांत आश्रय घेतात.असे म्हणतात की गावापासून दीड ते दोन किलोमीटर दूर डोंगराळ भागात असणारा हा गोठणदेव. जंगलात सोडलेल्या गुरांचा रक्षण करणारा देव म्हणून या देवाला “गोरक्षक गोठणदेव” असे नाव ठेवले गेले.

   जय गणेश कला क्रिडा-मंडळ, तळवणे सुतारवाडीच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सकाळी ९.०० वाजता श्री गोरक्षक गोठणदेवतेचे विधीवत पूजन, दुपारी ३.०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७.०० वाजता सामुदायिक महाआरती व तीर्थप्रसाद, ७.३० वाजल्यापासून महाप्रसाद, रात्री ८.३० वाजता कुपन लकी ड्रॉ (लॉटरी निकाल व बक्षीस वितरण) आदी कार्यक्रम होणार असून त्यानंतर रात्री ९.३० वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ, मळगाव, सावंतवाडी यांचा ‘संत कबीर’ हा ट्रीकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

   भाविकांनी तीर्थप्रसाद,  महाप्रसाद व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय गणेश कला-क्रिडा मंडळ, तळवणे सुतारवाडीच्या वतीने तसेच गावातील स्थानिक ग्रामस्थ्यांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *