
दिनांक: ५ मार्च २०२५
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
बांदा देऊळवाडी येथील जेष्ठ नागरिक संघाचे सक्रीय सदस्य तुकाराम महादेव मोरजकर (वय ७८)यांचे बुधवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. बुधवारी दुपारी बांदा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दैनिक सकाळ चे बांदा प्रतिनिधी निलेश मोरजकर, यांचे वडील तसेच शिक्षिका रिना मोरजकर यांचे ते सासरे होत.