
दिनांक: ५ मार्च २०२५
तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे
शिरोडा येथील माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” कार्यक्रमाला सुरुवात झाली श्री देवी माऊली मंदिर सुशोभीकरण तसेच परिवार देवता, मंदिर परिसर सुशोभीकरण, रंगरंगोटी सभागृह नूतनीकरण व इतर कामांची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू असल्याच्या अनुषंगाने संकल्प पूर्तीनिमित्त तसेच श्री देवी माऊलीची सोने व चांदीची नवीन उत्सव मूर्ती बनवण्याचा संकल्प करण्याच्या प्रेरणासाठी श्री देवी माऊली देवस्थान विश्वस्त, ग्रामस्थ व भाविक यांच्या सहभागाने हा “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” या परिसरात पुन्हा होत आहे. काल दी. ०३ मार्च २०२५ रोजी आजागाव सीमा ते श्री माऊली मंदिर अशी श्री गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आलेली.
हा सहस्त्रचंडी कार्यक्रम दी. ०४ मार्च २०२५ ते १२ मार्च २०२५ असा जवळजवळ आठ दिवस चालणार आहे. सहस्त्रचंडीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम ही आयोजित कण्यात आले आहेत. आज सकाळी आठ वाजल्यापासून मंगलाचरण, देवतांना नारळ ठेवणे, देवता प्रार्थना पुण्याहवाचन, संभार पूजन ब्राह्मण पूजन, गणपती पूजन, तसेच नांदीश्राद्ध, श्री देवी माऊली महापूजन, प्राकार शुद्धी, परिवार देवता अभिषेक सुहासिनी पूजन, आरती, महाप्रसाद असे बरेच कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमास दशक्रोशीतील सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिरोडा येथील स्थानिक ग्रामस्थांकडून तसेच देवस्थान कमिटी कडून करण्यात आलेले आहे.