आताच शेअर करा

संपादकीय: सिंधुदूर्ग

दिनांक: ५ फेब्रुवारी २०२५

डोंगरपाल गावातील मिलिंद शंकर परब यांच्या बागेमध्ये बिबट्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी दि. 0३ फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजता बिबट्याने अचानक दमदार एन्ट्री मारली आहे.  परब यांच्या बागेमध्ये त्यांचे दोन कामगार वास्तव्यास असून. बिबट्याच्या  आगमनाने घाबरले आहेत. बिबट्याने अचानक केलेल्या एन्ट्रीमुळे कामगारांच्या मनात  भीतीचे वातावरण निर्माण होऊन जिविताला धोका असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

     मालक मिलिंद परब हे सध्या परदेशात राहत असून जेव्हा वाघाने त्यांच्या बागेमध्ये एन्ट्री केली  तेव्हा त्यांच्या पिंजऱ्यात ठेवलेल्या पाळीव कुत्र्याने भुंकायला  सुरुवात केली त्यामूळे चाहूल तेथे असलेल्या दोन कामगार त्यांना लागली. कुत्र्याच्या जास्त भुंकण्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता भल्या मोठ्या बिबट्या वाघाचे दर्शन घडले.
     वाघाचे दर्शन घडल्यानंतर लगेच आपल्या  मालकाला  फोन वरून संपर्क साधून श्री.परब याना सगळी हकिगत सांगीतली. आपल्या प्राथमिक सुरक्षिततेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मध्ये हा  बिबटया कैद झाला आहे.हे  परब यांच्या निदर्शनास आले.त्या फुटेज मध्ये त्यांना  भला मोठा वाघ दिसत आहे. असे त्यांनी कोकण व्हिजन न्युज च्या वार्ताहर ने संपर्क साधला असता  ही सविस्तर महिती दिली आहे.  बोलताना  त्यांनी सांगितले की सीसीटीव्ही कॅमेरा  फुटेज  आपल्याकडे रेकॉर्ड  करून ठेवलेले आहेत.
  अशा या वाघाच्या बिनधास्त फिरण्याने गावातील लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. तरी  वन विभाग खात्याने यावर त्वरित कार्यवाही करून तातडीने त्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी
मागणी मालक परब व ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *