आताच शेअर करा

दिनांक: ५ फेब्रुवारी २०२५

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

कोंडूरा येथे आज श्री ब्राम्हण देव वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम होत आहे. या सोहळ्याचे औचित्त्य साधून सत्यनारायण महापूजेच आयोजन करण्यात आलेले आहे.
   वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम होणार असून सकाळी ०८:०० वा. धार्मिक विधी तसेच सत्यनारायण महापूजा व आरती, तीर्थप्रसाद ,महाप्रसाद, स्थानिकांची भजने होतील आणि रात्री मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
    दशक्रोशीतील बरेच ग्रामस्थ आवर्जून उपस्थित असतात. या कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोंडूरा ग्रामस्थ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *