
बांधा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
दिनांक:२७ जानेवारी २०२५
माजी पंतप्रधान भारतरत्न
अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधून बांदा शहर भाजपच्या वतीने अटल रंगभरण स्पर्धा
येथील अटल बिहारी वाजपेयी
उद्यान, मच्छी मार्केट मैदान येथे घेण्यात आली. यावेळी मुलानी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवला. जवळपास 150 हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. यावेळी विजेत्यांना रोख पारितोषिके व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे
पहिला गट (बालवाडी ते दुसरी)
प्रथम क्रमांक – अत्रेया नरसिंह काणेकर,
द्वितीय क्रमांक- प्राची प्रमोद मांजरेकर
तृतीय क्रमांक – ज्ञानदा प्रशांत गवस
दुसरा गट तिसरी ते पाचवी
प्रथम – आदिती परेश सावंत
द्वितीय- काव्या सूर्यकांत चव्हाण
तृतीय – विहान अरुण गवस
तिसरा गट सहावी ते इ आठवी
प्रथम – तन्वी नागेश धारगळकर
द्वितीय- समर्थ निलेश केसरकर
तृतीय- अब्दुलगणी अशरफ अली खान
व खुला गट
प्रथम सूर्यकांत गजानन चव्हाण
सर्व विजेत्यांचे रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.