
दिनांक:२३ जानेवारी २०२५
न्हावेली / वार्ताहर
कोकण रेल्वे कर्मचारी वृंद,सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २७ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार २६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार २६ रोजी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १२.३० ते २ वाजता महाप्रसाद,सायंकाळी ७ ते ८ वाजता ओकांर वारकरी भजन मंडळ,सातवायंगणी पेंडूर यांचे भजन,रात्री ९ वाजता रेन्बो फ्रेंड सर्कल कवठणी निर्मिती दोन अंकी मालवणी नाटक “ गावय हा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे कर्मचाऱ्यांनी केले आहे.