
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक :२० जानेवारी २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळ यांचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे संपन्न झाले आहे यामध्ये श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेचे लिपिक तथा दैनिक प्रहार दोडामार्ग तालुका प्रतिनिधी सुहास देसाई यांना त्यांचा गौरव म्हणून आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
यावेळी महामंडळ अध्यक्ष श्री अनिल माने सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर राज्य उपाध्यक्ष, प्रिया पवार, सरीता कुलकर्णी ,खैरुद्धिन सय्यद , श्रीधर गोंधळी मुबई सचिव देविदास पंडागळे विभागीय सचिव पुणे डॉ. गोविंद पांडूळे कोल्हापूर विभागीय सचिव गजानन नानचे यांचे सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
