
तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे
दिनांक:२० जानेवारी २०२५
शिरोडा सगरीमर्गावरून साटेलीच्या दिशेने मायनिंग भरण्यासाठी जात असणारा डंपर गाडी क्रमांक एम एच ०७ सी ५१६५ या भरदार वेगाने धावत असताना डाव्या बाजूने गाडी रस्त्याच्या बाहेर जाऊन उंचवट्यावर चढली. त्यामुळे गाडीचा उजव्या बाजूला तोल जाऊन उलट्या दिशेने रस्त्यावर पलटी झाली. ड्रायव्हरने आपला जीव वाचवण्यासाठी खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याच दिशेने गाडी पलटी मारल्याने तो त्या गाडीखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही गाडी शिरोडा येथून साटेलीच्या दिशेने मायनिंग भरण्यासाठी जात असताना तिरोडातिठा ते सावरदेव याच्या दरम्यान ही घटना दोन च्या सुमारास घडली. सोनू कृष्णाजी असे मृत व्यक्तीचे नाव असून आहे.अंदाजे २७ते २८ वर्षाचा रेडी गावातील नागोळे वाडी मधील असल्याचे समजते.
शिरोडा सावंतवाडी हा सागरी मार्ग असून अरुंद रस्ता असल्या कारणामुळे या रस्त्यावर बरेच अपघात घडल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. हा रस्ता जरी सागरीमार्ग म्हणून ओळखला गेला तरी दोन गाड्या समोरून जात असताना एका गाडीला थांबा देण्याची गरज भासते. ह्या मार्गाने मायनींचे डंपर भरधाव वेगाने पळत असल्याने अपघाताचे प्रमाण मार्गावर वाढले आहेत असे नागरिकांकडून समजते पोलीस प्रशासन अपघात स्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करत आहे.