आताच शेअर करा

संपादकीय:सिंधुदुर्ग

दिनांक २० मे २०२४

ग्रामपंचायत कार्यालय कोनशी दाभिळ तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग दिनांक ०७/११/२०२३/२४ रोजी ग्रामपंचायतीने विकास कामाचा प्रस्ताव सादर केला होता जावक क्रमांक ७४/२०२३/२४ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांच्या नावे हा प्रस्ताव असून या प्रस्तावा मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२३/२४ या आर्थिक वर्षामध्ये कोनशी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग ओपन जिम बांधणे या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये गट क्रमांक व उपविभाग ६७/१ गाव कोनशी या ठिकाणी ही ओपन जिम बांधण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली होती. ही जागा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या नावे असून त्या ठिकाणी जिम बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु ही जीम त्या ठिकाणी न बांधता भूमापन क्रमांक व उपविभाग १४/५ श्री अशोक कृष्णा सावंत यांच्या खाजगी जमिनीत त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ही ओपन जिम उभारण्यात आली होती. ग्रामपंचायत कोनशी दाभिळ यांनी सदरच्या व्यक्तीच्या मालकी हक्काच्या जमिनीत अतिक्रमण करून ही ओपन जीम उभारण्यात आली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण करून ही ओपन जिम उभी करण्यात आली आहे असे लक्षात येतात श्री सावंत यांनी ग्रामपंचायतीला आपल्या हस्ताक्षरातील अर्जाच्या माध्यमातून विचारणा केला असता ग्रामपंचायत इकडून कोणतेच समाधानकारक उत्तर आले नाही. म्हणून श्री सावंत यांनी गटविकास अधिकारी सावंतवाडी यांना आपल्या अर्जाद्वारे घडलेल्या प्रकारावर लक्ष टाकण्यासाठी विनंती अर्ज केला. तिथेही सावंत यांना कोणतीही दात मिळाली नाही. त्यानंतर सदर व्यक्तीने कोकण व्हिजन न्यूज चैनल कडे धाव घेतली चॅनेल चे संपादक यश माधव यांनी सर्व घडलेल्या  प्रकाराबद्दल प्रथम सदर व्यक्तीकडून माहिती घेतली.  त्यांनी कोनशी दाभिळ ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवकांना भेटून सर्व घटनेची माहिती मिळवली. त्यानंतर लक्षात आले की हे ग्रामपंचायतीने केलेले जोर जबरदस्तीचे अतिक्रमण आहे. घडलेला सर्व प्रकार लक्षात घेऊन सरपंच आणि ग्रामसेवक यांना हा घडलेला प्रकार चुकीचा आहे हे संपादक माधव यांनी निदर्शनास आणून दिले. सरपंच ग्रामसेवक आणि कोकण व्हिजन न्यूज चैनल चे संपादक यश माधव यांच्यामध्ये बैठक झाल्यावर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर ही ओपन जिम काढून टाकू असे आश्वासन दिले होते दिलेल्या आश्वासनावर ठाम  राहून ग्रामपंचायतीने आपली जबाबदारी पाळून अतिक्रमण केलेल्या जागेवरील ओपन जिम गेले २ दिवसांपूर्वी काढून टाकली  आहे. कोकण व्हिजन न्यूज चैनल च्या माध्यमातून श्री. अशोक सावंत यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सावंत यांनी न्यूज चैनल चे आभार मानले तसेच कोकण व्हिजन न्यूज चैनल ला सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत कोनशी दाभिळ यांचे आभार संपादक श्री. यश माधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *