सिंधुदुर्ग :संपादकीय
दिनांक २२ मे २०२४
मडूरा माजी सरपंच सौ. साक्षी तोरसकर यांच्या घरात आज संध्याकाळी विजांच्या गडगडाटा सह झालेल्या पावसामुळे घरात विजेचा धक्का बसून लाईट ची फिटिंग तुटून संपुर्ण घरात पसरली तसेच बोर्ड फुटून त्यातून सगळ्या वायरी बाहेर आल्या. मीटर संपूर्णपणे फुटला असून विजेचा प्रवाह संपूर्ण घरात पसरला गौरी सोमनाथ तोरसकर वय वर्ष ७ तसेच गौरेश राजन तोरसकर वय वर्ष ६ मूलांची आजी शांती शांताराम तोरसकर वय ७५ यांना विजेचा झटका लागला सध्या स्थितीत तिघही मोठ्या अपघातातून वाचले आहेत. महावितरणाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता फोन बंद लागत आहे. तसेच स्थानिक वायरमेन यांना फोन केला असता त्यांचाही फोन बंद लागत आहे. सदर घटना संध्याकाळी अचानक आलेल्या विजेच्या गडगडाटासह पावसामुळे घडली आहे.