आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक: १७ जानेवारी २०२५

बांदा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी राजाराम उर्फ आबा धारगळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बांदाग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला होता. यावेळी आबा धारगळकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अशी माहिती निवडणूक अधिकारी सौ लीला मोर्ये यांनी ही दिली.
बांदा ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता आहे भाजप च्या पक्षीय धोरणानुसार तिसर्‍या वर्षी आबा धारगळकर यांना ही संधी देण्यात आली आहे.
यावेळी भाजप च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत येथे उपस्थित राहून धारगळकर यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *