आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर

दिनांक:१० जानेवारी २०२५

महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिन व सप्ताहाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दल व बांदा पोलिस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात १०० हून अधिक लोकांनी सहभाग दर्शवत या शिबिराचा लाभ घेतला.
तसेच याच वेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद देत ३५ जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी पोलीस निरीक्षक विकास बडवे, राज्य उत्पादन शुल्क खात्याचे दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष सीताराम गावडे, एसएसपीएम मेडिकल कॉलेज व रुग्णालय पडवेचे मनीष यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी शिबिरात उपस्थित नागरिकांची आरोग्य चिकित्सा करून त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. एसएसपीएम मेडिकल कॉलेज व रुग्णालय पडवे यांच्या वैद्यकीय पथकाने आरोग्य चिकित्सा केली.
संपूर्ण दिवसभरात अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, रेश्मा सावंत, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, शैलेश केसरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष शेखर बांदेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गुरुनाथ नार्वेकर, हनुमंत सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, प्रसाद वाळके, डॉ. संदीप फाऊंडेशनचे खजिनदार मंगलदास साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष भांगले, सिंधु रक्तमित्रचे सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य निलेश मोरजकर, अक्षय मयेकर यांच्यासह पोलीस ठाणे अंतर्गत सर्व गावांचे पोलीस पाटील, होमगार्ड, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील संघटनेचे तालुका उपाध्यक्ष नितीन नाईक यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *