
सिंधुदूर्ग संपादकीय
दिनांक:९ जानेवारी २०२५
सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबई आयोजित पूर्णिमा मोरजकर लिखित गजाल गाथण व प्रकाश सरवणकर लिखित गजालीतली माणसे या दोन पुस्तकांचे प्रकाशन सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबई
याच्या वतीने दिनांक १२ जानेवरी २०२५ रोजी,सकाळी
११ वाजता व्हॅली ऑफ फ्लॉवर्स क्लब हाऊस, ठाकूर व्हिलेज, एव्हरशाईन मिलेनियम गार्डन जवळ,कांदिवली पूर्व,मुंबई येथे करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.प्रभाकर भोगले (सुप्रसिद्ध मालवणी लेखक)
मा.नितीन साळुंखे (मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक,
‘अज्ञात मुंबई’ पुस्तकाचे लेखक) या दोन मान्यवराच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन समारंभ पार पडणार आहे. पूर्णिमा मोरजकर या मडुरा इंग्लिश स्कूल,मडुरा या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी असून त्या रोणापाल ता. सावंतवाडी या गावच्या सुकन्या आहेत.या पुस्तक प्रकाशन समारंभाला मुंबई स्थित जास्तीत जास्त वाचकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबई यांनी केले आहे.
