आताच शेअर करा

तळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे

दिनांक: ३० डिसेंबर २०२४

विद्याविहार हायस्कूल, आरोस वार्षिक २०२४ – २५ स्नेहसंमेलन आज सादर होणार आहे.  विद्याविहार हायस्कूलचा *’जल्लोष २०२४*’  हा कार्यक्रम ठीक संध्या. ६:३० वाजता होणार आहे. यासाठी उदघाटक म्हणून आरोस गावचे सरपंच मा. श्री. शंकर नाईक यांच्या हस्ते कऱण्यात  येणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. माजी अध्यक्ष नारायण गणेश कामत व मा. श्री. निलेश मेघश्याम आरोलकर (सरपंच दांडेली ) उपस्थीत असणार आहेत.सकाळी ८ते १० वा. फनीगेम व वेशभूषा असे कार्यक्रम सादर होणार तसेच रात्री ७:३० वा. शाळेतील विद्यार्थ्यांचे अनेक वेगवेगळे कार्यक्रम सादर होणार आहेत. तरीही पंचक्रोशीतील ग्रामस्थ्यांनी या कार्यक्रमांस आवर्जून उपस्थित दाखवून  मुलांचे धैर्य व मनोबल वाढवावे. असे आवाहन आरोस ग्रामस्थ्यांच्या व शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *