ता : १२ जानेवारी २०२४
श्री सटेश्वर कला क्रीडा मंडळ रोणापाल. हा मंडळ गेली बारा वर्ष आपल्या मंडळाच्या माध्यमातून नवीन नवीन कार्यक्रम राबवत आहेत. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी या मंडळांनी आपल्या गावात भव्य पारितोषिकांची क्रिकेट स्पर्धा भरवली असून या स्पर्धेच्या माध्यमातून येणारा निधी हा गेली बारा वर्ष सतत आपल्या गावामध्ये सामाजिक कार्यासाठी वापरत आहेत. गेल्या बारा वर्षात श्री सटेश्वर रस्ता, गावातील पोट रस्ता, गावातील रहिवाशांना मदतीचा हात, श्री गणेश कोण गणपती विसर्जनाचा परिसर बांधकाम, शाळेतील मुलांना आर्थिक मदत असे विविध कार्यक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आलेला पैसा गोळा करून करत आहेत.गावातील अशा विविध उपक्रमाना हातभार लावत आहेत. तसेच गावातील आजारी मंडळींना आपला हात पुढे करून मदत करत आहेत. गेली बारा वर्ष आपल्या गावातील सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये विविध काम करून आपला गाव समाजासमोर कशा पद्धतीने अग्रगण्य ठेवता येईल याचा प्रयत्न करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम क्रिकेट मंडळांना आपल्या गावातील सामाजिक कार्यात उतरण्यासाठी बोध घेण्यासारखे कार्य आज रोणापाल गावातील श्री सटेश्वर कला क्रीडा मंडळ अगत्यपूर्ण करत आहेत.