आताच शेअर करा

तळवणे प्रतिनिधी: राहुल गावडे

दिनांक: २४ नोव्हेंबर २०२४ .

तळवणे गावातील महादेव गावडे (दादा गावडे ) वय ७० वर्षे यांची अचानक तब्बेत खराब झाल्याचे समजताच स्थानिकांनी त्यांना मळेवाड येथे सरकारी दवाखान्यात दाखल केले परंतू डॉक्टरानी त्याची तपासणी केली असता  डॉक्टरांना हृदय विकराच्या झटक्याने ते मृत झाल्याचे लक्षात आले.

डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांना काल दुपारी १:४० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली व त्यांना मृत घोषित करण्यात आले. सध्या त्यांना सावंतवाडी येथे शव केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब मुंबई येथे राहत असल्याने उद्या पर्यंत ते सर्व कुटुंब घरी येतील त्यामुळे त्यांचं कुटुंब आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ते तळवणे गावात एक गावातील गावकरी म्हणून प्रसिद्ध होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातं, दोन मुली, तीन भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *