
तळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे
दिनांक: २२ नोव्हेंबर २०२४
न्हावेलीतील पार्सेकर वाडीतील भूषण पार्सेकर या युवकाचा दोन दिवसापूर्वी न्हावेली येथे आपल्या टू व्हीलर गाडीला अचानक ब्रेक लावल्याने गाडी स्लिप होऊन हा अपघात घडला होता असे समजते. अपघातात भूषण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रथम त्याला सावंतवाडी येथे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
परंतु भूषणच्या डोक्याला जास्तच गंभीर दुखापत असल्याने सावंतवाडी दवाखान्यातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला लगेच गोवा बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला दोन दिवस आय सी यू विभागामध्ये ठेवण्यात आले होते पण शेवटी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आले नाही आणि आज सकाळी दहा वाजता भूषण या युवकाने जगाचा निरोप घेतला.
भूषण हा २५ वर्षाचा युवक होता जवळ जवळ पाच वर्षे तो संगीत क्षेत्रात होता. न्हावेली गावातील चांगला गायक म्हणून त्याची प्रसिद्धी होती. कोणत्याही गुरूकडून शिक्षा न घेता आपल्या कुटुंबातील गायनाचा वारसा पुढे चालवत असताना नियतीने काळाचा घाला घातला आणि आज भूषण याची प्राण ज्योत मालवली व त्याला आज मृत घोषित करण्यास आले. त्याच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असे कुटुंब आहे.

