बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक:२२ नोव्हेंबर २०२४
सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी (ता. २३) साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
केळी-खणानारळाने ओटी भरणे,नवस बोलणे,नवस फेडणे आदी कार्यक्रमांसह रात्री मंदिराभोवती पालखी
प्रदक्षिणा होणार व उशिरा मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.सर्व भाविक भक्तांनी देवीचे दर्शन व नाट्यरसिकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन देवस्थान समिती, ग्रामस्थ व वाफोली हितवर्धक संस्था मुंबई यांनी केले आहे.
