तळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे
दिनांक: २० नोव्हेंबर २०२४
सावंतवाडी विधानसभा मतदार संघात आज मतदानाचा हक्क मतदारांनी बजावला असून तळवणे येथे दोन ही बूथवर मतदारांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून आपला मतदानाचा हक्क बजावला. तळवणे येथे दोन ही बूथ वर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसत होती मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडले असून आज संध्याकाळपर्यंतचे एकूण मतदान :तळवणे मतदान केंद्र क्रमांक – २३५ ला गावात एकूण ७४:८६% मतदान झाले.
मतदान केंद्र क्रमांक – २३४ ला गावात एकूण 83.84% मतदान झाले.
मतदारांनी सुरळीत आणि कुठलाही गडबड गोंधळ न करता आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामूळे तळवणे येथे मतदानाच्या टक्केवारीत भर पडल्याचे दिसून येत आहे.