आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर

दिनाक:२० नोव्हेंबर २०२४


    सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बांदा शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात उन्हाचा जोर वाढल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात देखील धीम्या गतीने मतदान झाले. बांदा शहरातील सटमटवाडीतील काही ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचे आवाहन केले होते. मात्र मतदारांनी बहिष्कार धुडकावत उस्फुर्तपणे मतदान केले.
     सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजेपर्यंत ग्रामीण भागात ३० ते ३५ टक्के मतदानाची सरासरी राहिली. बांदा शहरात सकाळच्या सत्रात नेहमीच मतदारांचा उस्फुर्त मतदानात सहभाग असतो. सकाळी शहरातील सर्व मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. बांदा केंद्रशाळेत निवडणूक विभागाने आदर्श मतदान केंद्राची उभारणी केली. याठिकाणी दिव्यांग, वयोवृद्ध तसेच नवमतदारांचे प्रशासनाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
बांधायचे संध्याकाळच्या सत्रात मतदारांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने बांदा येथील मतदान ६७ % मतदान झाले आहे.
बांद्यातील सहा ही विधानसभा बूथ वर मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद देत ५३७९ पैकी ३५८९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. बूथ निहाय निकाल पुढीलप्रमाणे
बूथ क्रमांक २०७ – ८९८ पैकी ६४७, बूथ २०८ – १०२० पैकी ६६० बूथ २०९ – ७३६ पैकी ४९३, बूथ २१० – ११६० पैकी ७३३, बूथ २११ – ५४४ पैकी २४८, बूथ २१२ – १०३८पैकी ८०८  असे एकूण ६७% मतदान झाले.
    शहरात महायुती व महाविकास आघाडीच्या पक्षांनी बुथ लावले होते. सकाळच्या सत्रात कमी मतदान झाल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रोत्साहित करण्यात येत होते. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *