
संपादकीय: सिंधुदुर्ग
३ मे २०२४
श्री देवी माऊली पंचायतन मोरगांव देवस्थानचा” सुवर्ण महोत्सव” कार्यक्रम साजरा होत आहे. त्या निमित्ताने देवस्थान पंचायतनाच्या माध्यमातून विवीध कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता धार्मिक विधी, श्री देवी माऊली अभिषेक, होम हवन आणि पूर्णाहुती सकाळी १० वाजता सत्यनारायण पुजा, दुपारी १२:३० महाआरती आणि ओटी भरणे कार्यक्रम दुपारी १ वाजता महाप्रसाद व तिर्थ प्रसाद, विवीध भजने, महिलांची फुगडी, सांज आरती, पालखी प्रदक्षिणा सोहळा, स्मरणिका प्रदर्शन, सत्कार सोहळा आणि रात्रौ ठीक ९:०० जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळाचा”कालिका देवी दर्शन “हा दणदणीत प्रयोग होणार आहे. तरी श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानचा मोरगांव च्या वतीने सर्व भाविकांना आव्हाहन करण्यात आले आहे की भविकानी येवून या दैविक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
