सिंधुदूर्ग: संपादकीय
दि: ५ मे २०२४
नवसाला पावणारा हाकेला धावणारा श्री देव म्हातराबाबा यांचा प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षी ही मोरगांव येथे वार्षिक वर्धापन दीनउत्सव कार्यक्रम सोहळा सोमवार दिनांक ६ मे रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त भरघोस कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे. सकाळी ८:०० वाजता श्री देवी माऊली देवांचे समारंभ स्थळी आगमन, सकाळी ८: ००ते ९:३० श्री देव म्हाताराबाबा मूळ स्थानावर व मूळ असनावर अभिषेक,१०:ते १२: ०० सत्यनारायण महापूजा, त्या नंतर महाआरती, महाप्रसाद तीर्थ प्रसाद, भजने, पावणी कार्यक्रम, सांज अराती, आणि ठीक रात्रौ ८ ते ९:३० महापुरुष प्रासादिक भजन मंडळ आकेरी हुमरस यांचे सुश्राव्य भजन आणि रात्रौ १०:०० वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ प्रस्तुत नवीन ट्रिकसिनयुक्त धडाकेबाज “अजिंक्यतारा” नाट्यपुष्प सादर करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान देवस्थानं कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.