आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर

३ मे २०२४

येथील अत्यंत जागृत असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिर कलशरोहणच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक ५ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
   सकाळी ८ वाजता गणपती पूजन, देवतास नारळ, विडे अर्पण करून सामुदायिक गाऱ्हाणे, सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्र अभिषेक अनुष्ठान, श्री देवी भूमिका मंदिरात श्री सूक्त आवृत्ती अनुष्ठान, श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवृत्ती जप अनुष्ठान, दुपारी १.३० वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ वाजता स्थानिक मंडळाची भजने, रात्री ७ ते ९ युवा कीर्तनकार ह. भ. प. कु. आर्या मंगलदास साळगावकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
   रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत पालखी सोहळा होणार आहे. ज्या भक्त गणांना महाप्रसादासाठी वस्तुरूप देणगी द्यायची असेल त्यांनी मंदिराच्या कार्यालयात आणून द्यावी. तसेच रविवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रम असल्याने यादिवशी इतर कोणतीही वयक्तिक स्वरूपाचे धार्मिक विधी केले जाणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. कलशरोहण वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव बांदेश्वर भूमिका देवस्थान यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *