आताच शेअर करा

बांधा प्रतिनिधी :अक्षय मयेकर

दिनांक:२१ ऑक्टोंबर २०२४

विनापरवाना दारू वाहतुक केल्याप्रकरणी बेडगे येथील दोघांवर व २ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत २० लाख किमतीचा दहा चाकी ट्रक व ८६ लाख ४० हजार रुपयाची दारू असे एकूण १ कोटी ६ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व शिवाजी महादेव शिंगाडे (वय – ५३) आणि विद्यासागर बापू ऐतवडे (वय ४०) दोघेही रा. बेडग, तालुका- मिरज, जिल्हा-सांगली या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई इन्सुली चेकपोस्ट येथे करण्यात आली.

याबद्दल अधिक माहिती अशी की निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे या नाकाबंदी दरम्यान हा ट्रक तपासल्या असता या गाडीत तब्बल ८६ लाख ४० हजार रुपयाची दारू असल्याचे व त्यासंबंधी कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले. त्यासंबंधी दोघांना ताब्यात घेण्यात आले. व बेकायदेशीर दारू भरून देणारा व घेणारा असे दोन अज्ञातावर गुन्हे दाखल केले गेले. बांदा पोलिस उप निरीक्षक श्री झांजूर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजेंद्र कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *