
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक: २० ऑक्टोंबर २०२४
माजी खासदार निलेश राणे शिवसेना पक्षात प्रवेश करणार व शिवसेने तर्फे त्यांना उमेदवारी जाहीर होणार अशी चर्चा पूर्ण सिंधुदुर्गात रंगात असतानाच आज बांदा येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निलेश राणे साहेबांचे जोरदार स्वागत केले. यावेळी ‘निलेश साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजु परब, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, बांदा माजी उपसरपंच जावेद खतीब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे, आनंद शिरवलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब,बांदा ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर, गुरूनाथ सावंत, साई धारगळकर,ज्ञानेश्वर सावंत, साई सावंत, शिवसेना तालुका प्रमुख बबन राणे, विभाग प्रमुख राजेश विर्नोडकर, बांदा युवासेना विभाग प्रमुख प्रथमेश गोवेकर, मयुरेश महाजन, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी नगरसेवक गुरुदास मठकर, सर्वेश मुळ्ये, दादा साळगांवकर, विजय इंगळे, प्रशांत राणे, समीर प्रभू गांवकर, प्रज्वल वर्दम, विनोद सावंत, संजय वरेरकर, सत्यवान बांदेकर, वसंत तांडेल, माजी सरपंच दीपक सावंत, इन्सुली ग्रा. पं. सदस्य महेश धुरी, वाफोली उपसरपंच विनेश गवस, राजा सावंत, विकी केरकर, निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, प्रवीण नाटेकर, , अक्षय मयेकर, राजा सावंत, उमेश पेडणेकर, सुनील धामापूरकर, राघू चितारी, अक्षय नाटेकर, संजय नाईक, भूषण सारंग, भूषण आंगचेकर, सुनील धामापूरकर, प्रवीण नाटेकर, अक्षय केसरकर, ऋषी हरमलकर, अभिजित देऊलकर, तुषार साळगावकर, हेमंत गावडे, प्रशांत बोवलेकर, समीर नाईक, क्लेटस फर्नांडीस, राज वरेरकर, परिक्षीत मांजरेकर, पांडुरंग नाटेकर, राकेश वाळके, अमेय मडगांवकर, मानेश्वर चौगुले, गौरव कदम, योगेश गावडे, सचिन साटेलकर, संजय गोसावी, प्रथमेश गोवेकर, राकेश विर्नोडकर, औदुंबर पालव, सोहेल जमादार, प्रशांत जाधव, दाजी सावजी, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, सूरज बिरमोळे, समीर पालव आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुसळधार पाऊस असतानाही रात्री उशिरापर्यंत बांदा, सावंतवाडी व वेंगुर्ले येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

