आताच शेअर करा
गणेश मेस्त्री सह त्यांचा समूह आणि मंडळाचे कार्यकर्ते

बांदा प्रतिनिधि / संकेत वेंगुर्लेकर

दिनांक: ८ ऑक्टोंबर २०२४

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा या  मंडळाची यावर्षीची दुर्गा मातेची मूर्ती मडूरा  दशक्रोशीतील मूर्तिकार मडूरा गावचे सुपुत्र वक्रतुंड आर्ट्स चे मालक श्री.गणेश प्रकाश मेस्त्री व त्यांच्या समूहाचा  सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ बांदा कट्टा कॉर्नर येथे सत्कार करण्यात आला. अतिशय सुंदर, सुबक, आकर्षक आणि तेजपुंज, चेहऱ्यावर तेज असणारी  वेगवेगळ्या रंगछटानी नटलेली मन भारावून टाकणारी मुर्ती घडवल्यामुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची अलोट गर्दी होत आहे. तसेच गणेश मिस्त्री यांनी आपल्या अल्पावधीत मूर्तिकार कलावंत म्हणून आपला या क्षेत्रात पाया रुतला आहे. त्यामुळे काही काळातच त्यांची कला परदेशात जाऊन पोचली आहे. गेल्या गणेश चतुर्थी मध्ये त्यांची गणपतीची मूर्ती अमेरिका, इंग्लंड, थायलंड, आफ्रिका, नेदरलँड, कुवेत, आणि दुबई या परदेशात  जाऊन पोचली आहे.  त्या ठिकाणी त्यांनी घडवलेल्या मूर्तींचे पूजनही झालेला आहे. अशा या मूर्तिकाराचे यावर्षी दुर्गा मातेची मूर्ती बांदा कट्टा कॉर्न येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यांनी बसवली आहे. त्यामुळे त्यांची मूर्ती पाहण्यासाठी अनेक भक्तगण येत असून सगळ्या स्तरात त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *