
सिंधुदुर्ग / संपादकीय
दिनांक:६ ऑक्टोंबर २०२४
काल रोणापाल देऊळवाडी येथे श्री. उदय भगवान गावडे यांच्या घरी रात्री ९ ते ९:३० च्या दरम्याने अज्ञात इसमाने घराच्या पाठीमागच्या बाजूस पडवी मधून शिडीच्या साह्याने छप्परावर चडून नळे काढले व घरात प्रवेश केला.अज्ञात इसम चोरी करून पलायन झाला आहे .उदय गावडे यांचे वय ६४ वर्षे असून आपल्या पत्नी सह नवरात्र उत्सवानिमित्त त्यांच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात चालु असणाऱ्या कार्यक्रमास गेले होते. झोप आली म्हणून पत्नीला सांगून मंदिरातून घरी परतले. घराचा दरवाजा उघडला व स्वयंपाक घरात गेल्यावर त्यांना पाठीमागच्या पडवीचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपल्या पत्नीला फोन लावून विचारले. घराचा पाठीमागचा दरवाजा तू उघडा ठेवला होतास का? त्यावेळी तिने नाही म्हणून सांगितले त्यानंतर त्यांनी आपल्या घरात खोल्यांमध्ये जाऊन बघितले असता त्यांना दोन कबाटे उघडी पडून कपडे अस्ताव्यस्त फेकण्याच्या निदर्शनास दिसून आले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आपल्या घरात काहीतरी अनुसूचित प्रकार घडलेला आहे. म्हणून त्यांनी गावातील नागरिकांना बोलावून गावचे पोलीस पाटील सौ.निर्जरा परब यांना कळवण्यात आले. त्वरित घटनास्थळी पोलीस पाटील उपस्थित राहून पोलीस यंत्रणेला याची माहिती दिली. बांदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या सह त्यांची यंत्रणा घेऊन घटनास्थळी पोचले. पोलिसांच्या तपासात व चौकशीअंती एक १० ग्रॅम सोन्याची माळ व १८००० हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. अज्ञात इसमाच्या विरोधात पोलिस यंत्रणेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती बांदा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल श्री नाईक यांनी दिली.
