आताच शेअर करा
ग्रामस्थांसोबत निवेदन देताना न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर

न्हावेली प्रतिनिधि

दिनांक: ६ ऑक्टोंबर २०२४
पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून सुरक्षेसाठी सावंतवाडी शहरात लावण्यात आलेली सीसीटीव्ही यत्रंणा बंद स्थितीत आहे. ती यत्रंणा तत्काळ कार्यान्वित करा, अन्यथा उपोषण करु, असा इशारा न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.
काल येथील आरपीडी रस्त्यावरून जात असताना दुपारी १२.३० च्या सुमारास एका वाहनाने धडक देत तेथून पलायन केले. याची माहिती आपण पोलिस स्टेशन सावंतवाडी येथे दिली असता याची शहानिशा करत असताना या रस्त्यावरील सावंतवाडी पोलिस स्टेशन मार्फत लावण्यात आलेली सीसीटीव्ही यत्रंणा बंद स्थितीत आढळली. त्यामुळे अज्ञात वाहनाची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे याचा आर्थिक फटका आपल्याला सोसावा लागला आहे. तरी यापुढे सावंतवाडीतील नागरिकांना जीवितास हानी तसेच अशा इतर समस्यांना सामोरे जावे लागेल. याची पोलिस प्रशासन यांनी योग्य ती काळजी घेऊन कार्यवाही न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा धाऊसकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *