
सिंधुदुर्ग / संपादकीय
दिनांक:५ ऑक्टोंबर २०२४
कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड या रेल्वे विभागाच्या कंपनीमध्ये काम करत असताना श्री. हिराजी गोविंद परब यांना विशेष योग्यता प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
हीराजी परब हे कांटेवाला मडूरे कर्मचारी संख्या क्रमांक ६२७४ परिचालन या विभागामध्ये काम करत आहेत.मडूरा रेल्वे स्टेशनवर आपली कामगिरी बजावत असताना ह्या वेळात माल रेल्वे गाडी मडूरा रेल्वे स्टेशन वरून पास होत होती. गाडीच्या खालून काहीतरी लोमकळत आहे असे परब यांच्या निदर्शनास आले. आपली जबाबदारी म्हणून त्यांनी लगेच लाल सिग्नल दाखवून गाडी थांबविली आणि ह्याची बातमी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन लोको पायलट कर्मचाऱ्याला निदर्शनास आणून गाडी सुरक्षित ठिकाणी थांबविण्यात आली. त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण पार पाडून होणारा अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना चांगल्या कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन हिराजी परब यांना सन्मानित करण्यात आले. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
