आताच शेअर करा

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठनकर

दिनांक:१९ सप्टेंबर २०२४

कोकण व्हिजन न्यूज चैनल चे सातार्डा प्रतिनिधी संदिप कवठनकर यांनी विमान प्रवासात गोव्याचे खासदार श्रीपादजी नाईक यांची भेट घेतली.गोवा सिंधुदुर्ग मधील काही विषयावर  चर्चात्मक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पत्रकारितेच्या माध्यमातून गोवा सिंधुदुर्ग सीमेवरील आरोग्य, बेरोजगारी, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. काही प्रलंबित विषय त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून सिंधुदुर्ग आणि गोवा यामधील ऐक्य टिकून ठेवण्यात मदत होईल अशा अनेक गोष्टीवर विमान प्रवासात चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *