
बांदा: प्रतिनिधि
दिनांक:१६ सप्टेंबर २०२४
कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा सण, गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भक्तगणांनी भक्ती भावाने ९व्या दिवसाचे विसर्जन केले.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात नऊ दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. मडूरा पंचक्रोशीसह परिसरातून असंख्य गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने सर्व विघ्नांचा नाश करणारा गणराया विसर्जनास जात असताना आपल्याही पाठीमागे असणारी संकटे, दुःखे, दारिद्र्य दूर होण्यासाठी किरिवारी जाण्यासाठी वाटेत झोपण्याची परंपरा आजही जपून ठेवण्याची परंपरा दिसून आली. अनेक भक्तगणांनी आपल्या जीवनातील असलेला त्रास नष्ट व्हावा आणि सुख समाधान आयुष्यात लाभाव यासाठी विनम्रपणे गणेशाला आव्हान करताना दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी भजन आरती करून भाविकांनी जल्लोष केला.
