
गोवा:पेडणे प्रतिनिधि
दिनांक: ४ सप्टेंबर २०२४
मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी मांद्रे मतदार संघातील एकूण २००० गरजवंत नागरिकांना चतुर्थीसाठी खास कडधान्याचे वितरण साहित्य सामान वितरित केले.
आमदार जीत आरोलकर हे मांद्रे मतदार संघाचे आमदार होण्यापूर्वी मतदार संघातील जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य मदतीचा हात देत होते. त्यानंतर आमदार झाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत मांद्रे मतदार संघातील जे शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे खत वितरीत केले आहे. चतुर्थी दिवाळी नाताळ अशा सणाला गरजवंतांना ते मदतीचा हात देत आहेत.यंदा चतुर्थीला मांद्रे मतदारसंघातील विरनोडा तुये, पार्से,आगरवाडा, मोरर्जी, मांद्रे, हरमल, पालये, केरी या पंचायत क्षेत्रातील एकूण दोन हजार नागरिकांना चतुर्थीसाठी खास साहित्य सामान वितरित केले.
याविषयी आमदार जीत आरोलकर यांनी बोलताना सांगितले की गरजवंतांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या नजरेतून आपण आणि मांद्रे उदरचत संस्थेमार्फत लोकांना सहकार्य करत असतो हया कामात एडवोकेट सिद्धी अरोलकर ही मदत करत असल्याचे जीत आरोलकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. मांद्रे मतदार संघातील ज्या प्रमुख समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यासाठी सरकारकडून आपल्याला योग्य वेळी योग्य सहकार्य मिळत आहे.
