बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: ४ सप्टेंबर २०२४
जिल्हा परिषद केंद्र शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री जे.डी.पाटील यांना महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक २०२४हा पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजाची नि: स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देश्याने राज्य शासनाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. जे.डी.पाटील यांनी आपल्या जवळपास २०वर्षे सेवेच्या आपल्या सेवेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच शाळेत राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी राबविलेले उपक्रम, विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेले सुयश, स्काऊट गाईड चळवळीत उल्लेखनीय कार्य इत्यादी शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. रोख एक लाख दहा हजार रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून ५सप्टेंबर हा पुरस्कार मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा , लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानपरिषद सदस्य जगन्नाथ अभ्यंकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल करण्यात येणार आहे. जे.डी.पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येणार आहे.