आताच शेअर करा

सिंधुदूर्ग: संपादकीय

दिनांक: २ सप्टेंबर २०२४

मळवाड परिसरात सुरू असलेल्या चिरे खाणीतून सतार्डा चेक पोस्ट आणि आरोंदा चेक पोस्ट येथे दोन ब्रास चे परमिट काढून मोठ्या सहाचाकी गाडीतून तिन ते चार ब्रास चिरे वाहतूक केली जाते. तसेच एका पास वरुन तीन ते चार वेळा फेऱ्या मारून शासनाचा करोडो रुपयाचा महसूल डुबवला जात आहे. याकरिता दोन्ही चेक पोस्टवर असणारे सीसीटीव्ही तपासून संबंधित गाड्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मनसे संपर्क अध्यक्ष सावंतवाडी श्री. महेश परब यांनी सावंतवाडी तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांना निवेदनातून केली आहे.
तसेच सकाळच्या वेळी सदर रस्त्यावरून शाळकरी मुलांची ये – जा मोठ्या प्रमाणात होत असते. चिरेखणी मधून निघालेले डंपर हे त्यावेळेस भरधाव वेगाने  कर्कश हॉर्न मारत पळत असतात. त्यामुळे शाळकरी मुले  शाळेत जात असताना हॉर्न चा अवाज कानावर पडल्यावर अचानक घाबरून आणि दचकून रस्ता  क्रॉस करत असतात. आशा  वेळी अपघात होण्याची शक्यता आहे. अचानक अपघात घडल्यास ह्याला जबाबदार कोण? असा सवाल श्री. परब यांनी प्रशासनाला केला आहे. आणि हे  आपल्या निदर्शनात   आणून दिल्यानंतर जर का अपघात घडल्यास यास सर्वस्वी जबाबदार संबंधित प्रशासन राहील. याची नोंद घेऊन संबंधित वाहतूक करणाऱ्या डंपरवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी  श्री. परब यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच ही प्रत आर. टी. ओ. ऑफिस ओरस आणि प्रांत कार्यालय सावंतवाडी यांना देण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *