सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनांक:१ सप्टेंबर २०२४
मराठ्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि शासनाच्या विरोधात उभे राहून मराठी आरक्षणा बाबतीत उपोषण आणि आंदोलन छेडणारे मराठी नेते मनोज जरांगे पाटील मालवण राजकोट मधील छत्रपती शिवरायांची पुतळा कोसळल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी श्री. जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी शरदचंद्र पवार गटाच्या महिला कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांनी मराठी नेते जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना राखी बांधली तसेच मराठा नेता असलेल्या भाऊरायाला पुढील आयुष्य आणि वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.