
बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: ३० ऑगस्ट २०२४
बांदा वाफोली रस्त्यावर पाऊस जोराचा पडत होता नाला पूर्ण भरून रस्त्यावर पाणी आले होते व वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती . पाऊस गेला तरी पाणी काही रस्त्यावरून कमी होत नव्हते. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते शामू धुरी यांनी जोपर्यत ग्रामपंचायत सदस्य याठीकाणी येत नाहीत तो पर्यंत वाहतूक सोडणार नसल्याची भूमिका घेतली . तेव्हा त्याठीकाणी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रशांत बांदेकर आणि श्री. रत्नाकर आगलावे हे पोहचले . पाऊस गेला तरी नाल्यातील पाणी रस्त्यावर गुडघाभर साचून राहीले होते . सदस्यांनी जवळच हायवेचे काम चालू होते तेथील कामगारांना मदतीसाठी बोलावले . कामगार आले पण नाल्यात पाणी जास्त असल्याने कोणीच नाल्यात उतरायला बघत नव्हता . त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री . प्रशांत बांदेकर स्वतः नाल्यात उतरले व साचून राहीलेला कचरा काढायला सुरुवात केली पाठोपाठ सामाजिक कार्यकर्ते श्री . शामू धुरी मदतीसाठी आले व त्यांनी साचून राहीलेला सर्व कचरा साफ केला . त्यानंतर रस्त्यावरील सर्व पाणी खाली गेले .
