
सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनांक :३० ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी सिंधुदूर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ आणि हिंदी विवेक मासिक पत्रिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनाक १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०: ०० वाजता जिल्हास्तरीय हिंदी शिक्षक संमेलन आणि हिंदी साहित्याचे समरसता योगदान विषयावर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सिंधुदूर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी ओरस जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजन करण्यात आले आहे. मा.पद्मश्री रमेश पतंगे (अध्यक्ष: हिंदुस्तान प्रकाशन संस्था) मा.शितलाप्रसाद दुबे (कार्याध्यक्ष: महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी) मा.सुनील शेट (अध्यक्ष:गोवा हिंदी अकॅडमी)मा. कैलास जाधव (सदस्य राज्य अनुदान समिती हिंदी निर्देशनालय भारत सरकार) मा. संजय वेतुरेकर (सिं.जि.मा.उ.मा.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थीत राहावे अशी विनंती श्री सुमंत दळवी, सदाशिव सावंत, सचिन निंबाळकर, अमोल पेडणेकर, पल्लवी अनवेकर यांनी केली आहे.
