आताच शेअर करा

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि

दिनांक:२८ ऑगस्ट २०२४

कोरगाव येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री कमलेश्वर हायस्कुल, पेठेचावाडा, श्री कमलेश्वर हायस्कुल देऊळवाडा आणि श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कोरगावच्या विध्यार्थ्यानी माद्रे येथील यश शूटिंग अकादमी ला    भेट देऊन    अखिल भारतीय रायफल शुटींग स्पर्धेचे अवलोकन केलें यावेळी यश शूटिंग अकादमी चें संस्थापक योगेश्वर पाडलोस्कर, आंतर राष्ट्रीय नेमबाज तथा प्रशिक्षक भाग्यश्री पाडलोस्कर, श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव नीलकंठ थळी, श्री  कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक विठोबा  बगळी, क्रीडा शिक्षक नेहाल कशालकर,
हायस्कुलचे शिक्षक राजेश गांवकर, क्रीडा शिक्षक देवानंद गावडे आदी उपस्थित होते.
या वेळी  यश शूटिंग अकॅडमीच्या प्रशिक्षक भाग्यश्री पाडलोस्कर यांनी विध्यार्थ्यांना या खेळाची प्राथमिक माहिती दिली यावेळी विध्यार्थ्यानी या ठिकाणी चालू असलेल्या  अखिल भारतीय स्तरावरील प्री राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेतील १० मीटर रायफल स्पर्धेचे आवलोकन केलें तसेच २५ मीटर, ५० मीटर रेंज ची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *