आताच शेअर करा

सिंधुदूर्ग: संपादकीय

दिनांक:२८ ऑगस्ट २०२४

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट मालवण येथे उभारलेला पुतळा केवळ  ९ महिन्यात  सोमवारी खाली कोसळला. त्या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारच्या बाबतीत अनेक प्रतिक्रिया उमटत असताना दिसत आहे. (शरदचंद्रजी पवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष श्री. विवेक गवस म्हणाले की सध्या स्थित असलेले सरकार निर्लज्ज आणि निष्कलंक भ्रष्टाचारी असे हे सरकार आहे त्यामुळेच ही घटना घडलेली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ९ महिन्यात पडतो म्हणजेच कुठेतरी ह्या निधीचा वापर वाम मार्गाने करण्यात आला आहे. असे निदर्शनास दिसून येत आहे.

ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या नऊ महिन्यात कोसळला त्याच पद्धतीने हे महाराष्ट्र सरकार देखील काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोसळेल याबद्दल शंकाच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा फक्त दिखावा करून घाई घाईत कार्यक्रम उरकून घेणारे आता मात्र हातावर हात धरून बसू नयेत. संबंधित दोषी असणाऱ्या शासकीय अधिकारी ठेकेदार यांच्यावर त्वरित कारवाई करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करावे.आणि काम करणारा ठेकेदारास त्याच्यावर खटला भरून कठोर शिक्षा करावी असे श्री. गवस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *