
बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा बांदा यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या हेतूसाठी माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झाला. या समारंभासाठी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा बांदा च्या शाखा व्यवस्थापिका श्रीमती खानोलकर मॅडम आणि त्यांच्या सहकारी कु. श्रेया देसाई उपस्थित होत्या. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक तसेच उत्तेजनार्थ क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस. के. सावंत सर यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या अशा उपक्रमांबद्दल लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चे संस्थापक, अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच शाखा बांदा च्या व्यवस्थापिका व त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी प्रशालेचे कलाशिक्षक श्री गणेश चौरे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

