
बांदा (प्रतिनिधि)
दिनांक:२४ ऑगस्ट २०२४
मुंबई वरून गोव्याच्या दिशेने जात असणारा कंटेनर बांदा येथे बैठक कॅफे समोर डिव्हायडर ओलांडून आत घुसल्याचे निदर्शनास येत आहे.
सविस्तर माहिती अशी की हा कंटेनर रात्री दहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जात असताना त्या कंटेनरमध्ये बिघाड आल्या कारणामुळे डिव्हायडर तोंडून आत घुसला आहे. त्यामुळे रहदारीस गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना अडथळा होत आहे. गाडीच्या ड्रायव्हरला विचारणा केला असता त्यांनी आपले नाव बहादूर असे सांगितले आहे. हा कंटेनर गोव्याच्या दिशेने पार्सल घेऊन जात आहे. गाडीमध्ये मोठा बिघाड आल्या कारणामुळे क्रेनचा वापर करूनही गाडी बाहेर निघाली नाही. रात्री १०:०० वा सुमरास हा प्रकार घडला आहे. अशी महिती वाहन चालकाने दिली आहे.म्हणून संबधित गाडीच्या कंपनीला फोन करून कळवण्यात आले आहे. हा कंटेनर जोपर्यंत कंपनीचा टेक्निशियन येत नाही तोपर्यंत इथेच पडून राहण्याची शक्यता ड्रायव्हरने दर्शविली आहे.ह्या गाडीचा नंबर एम. एच. ४८बी जी ८८२१ असून पावसामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

