
सिंधुदूर्ग: प्रतिनिधि
दिनांक:२४ ऑगस्ट २०२४
मळेवाड येथील चिरेखणीवर ५ ऑगस्ट रोजी जांभा दगडाने भरलेला डंपर पलटी होत असताना त्यातील दगड तीन वर्षीय मुलीवर पडून मुलीचा मृत्यू झाला होता त्या नंतर त्या मुलीला येथिल माळरानावर जमीनीत दफन करण्यात आले होते. ही माहिती सोशल मीडियात प्रसिद्ध होताच तात्काळ सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दखल घेत घटनास्थळी धाव घेत आज दफन केलेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढून सेवाविच्छेदनाकरिता कोल्हापूर येथे पाठवण्यात आला आहे
या मुलीच्या शव दफन प्रकरणी मुलीचे आई-वडील त्याचप्रमाणे डंपर चालक मालक जेसीपी मालक यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, नायब तहसीलदार मनोज मुसळे, वैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर त्याच बरोबर दोन महिला पंच व अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीचे वडील घटनास्थळी उपस्थित होते.

