आताच शेअर करा

न्हावेली / वार्ताहर

दिनांक:२३ ऑगस्ट २०२४
     लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित गणेश दर्शन स्पर्धा व पारितोषिक वितरण महासोहळा रविवार २५ ॲागस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.यावेळी उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश विशाल परब,कलारत्न पुरस्कार प्राप्त पद्मश्री परशुराम गंगावणे,तहसीलदार श्रीधर पाटील,पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गावंकर आदी उपस्थित राहणार आहेत.
    त्यानिमित्त सायंकाळी ५.३० वाजता भगवती सभागृह मळगाव येथे डबलबारी भजनाचा सामना थेट लाईव्ह होणार आहे.यात लिंग रवळनाथ भजन मंडळ,पोखरण कुडाळ बुवा – समिर कदम  विरुद्ध लिंगेश्वर भजन मंडळ,घोडगे भरणी बुवा – विनोद चव्हाण यांच्यात हा सामना होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन अमित पालव यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *