
सिंधुदूर्ग: प्रतिनिधि
दिनांक: २३ ऑगस्ट २०२४
निरवडे येथील हॉटेल मध्ये अल्पवयीन मुलीस नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी निरवडे येथील प्रथमेश विजय जाधव याच्यावर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीताला न्यायालयाने २५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. २३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ९:३० ते २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता या कालावधीत वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यातील हॉटेलमध्ये प्रथमेश विजय जाधव वय २१ याने एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून तिच्यावर अत्याचार केले जर सदर प्रकरणाबाबत कोणाला काही सांगितल्यास फोटो वायरल करणार तसेच घरी येऊन राडा करणार तुझ्या घरच्यांना बदनाम करणार अशी धमकी देऊन पिढीतेवर जाधव याने अत्याचार केले तसेच पीडितेने त्याचा फोन उचलला नाही म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून आरोपी प्रथमेश विजय जाधव याच्यावर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास बडवे करीत आहेत.
