आताच शेअर करा

बांदा प्रतिनीधी: संकेत वेंगुर्लेकर

दिनांक: १८ ऑगस्ट २०२४

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा ने आयोजित केलेल्या मॅराथॉन रन फॉर हेल्थ स्पर्धेचे उद्घाटन बांदा पोलीस चे हेड कॉन्स्टेबल राजेश गवस यांच्या हस्ते झाले या स्पर्धेत आठवी ते दहावी मुलींच्या गटात वंशिका सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला तर गीतांजली देसाई हिने द्वितीय आणि आर्या म्हावळणकर ने तृतीय क्रमांक प्राप्त केला तसेच आठवी ते दहावी मुलांच्या गटात विराज नाईक प्रथम, बाबुराव वरक द्वितीय तर ब्रेन्डन फर्नांडिस तृतीय नंबर पटकाविला
त्याचप्रमाणे खुल्या गटातून भविष्य गंगावणे प्रथम , भावेश माळी द्वितीय व सत्यम रावत याने तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी पोलीस हेड  कॉन्स्टेबल सिद्धार्थ माळकर, पोलीस कॉन्स्टेबल मयुराज कमतनूरे ,प्रसाद पाटील, प्रथमेश पोवार, प्रशांत बोटे  महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका  परब ,रोटरी सदस्य राजाराम ऊर्फ आबा धारगळकर, शैलेश केसरकर,  स्वप्निल  धामापूरकर , सुदन केसरकर तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केदार कणबर्गी, रोटरॅक्ट क्लब चे अध्यक्ष अवधूत चिंदरकर, अक्षय कोकाटे, दत्तराज चिंदरकर, मिताली सावंत, ईश्वरी कल्याणकर, विनिता कुबडे, कविता बांदेकर, नेहा निगुडकर, शिवम गावडे, अमित धोंगडे, संकेत वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ७० विद्यार्थी सहभागी झाले होत़े. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली सावंत हिने केले तर आभार शिवम गावडे याने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *