(गोवा): पेडणे प्रतिनिधि
दिनांक १६ ऑगस्ट २०२४
विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था दिवसेंदिवस प्रगती करत आहे. विद्यार्थ्यांच्या पूर्ण शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करत असलेल्या अशा शैक्षणिक संस्थांना त्यांचा विस्तार करण्यासाठी परिसर सुशोभीकरण करण्यासाठी पंचायत मंडळ सदोदित सहकार्य करेल, अशी ग्वाही सरपंच मुकेश गडेकर यांनी मोरजी येथील विद्या प्रसारक हायस्कूल परिसरात चेकर टाइल्स बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करताना केले.
यावेळी विद्याप्रसारक समाज संस्थेचे चेअरमन गणेश शेटगावकर उपाध्यक्ष अनंत शेटगावकर, मुख्याध्यापक दिलीप मेथर उपसरपंच सुप्रिया पोके, पंच फटू शेटगावकर, माजी उपसरपंच अमित शेटगावकर, जनार्धन शेटगावकर, प्रकाश शेटगावकर ,माजी सरपंच तथा पंच सदस्य सुरेखा अमित शेटगावकर, पंच विलास मोर्जे, दादी शेटगावकर, शिक्षिका मंजिरी नाईक , भास्कर शेटगावकर खजिनदार संजय दाभोलकर आदी उपस्थित होते .
क्रीडा मैदानाची गरज
सरपंच मुकेश गडेकर यांनी बोलताना सांगितले गावात दोन हायस्कूल आहेत. परंतु या हायस्कूलच्या मुलांना क्रीडा क्षेत्रात आघाडी घेत असताना साधन सुविधांचा अभाव आहे. व्यवस्थित क्रीडा मैदानाची सोय नसल्याने सरकारने लवकरात लवकर टेमवाडा भागात जे क्रीडा मैदान आहे. त्या क्रीडा मैदानाची दुरुस्ती करून या दोन्ही हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षण आणि त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी साधन सुविधा उपलब्ध करून द्यावी. आज प्रत्येक ठिकाणी क्रीडा क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थी झेप घेत असल्याचे चित्र दिसून येते. परंतु या गावांमध्ये तशा प्रकारची सोय क्रीडा मैदानाची नसल्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करत असताना अडचणी येत असतात. त्यामुळे सरकारने दोन्ही हायस्कूल साठी क्रीडांगणे उभारून सोयी करावी. अशी मागणी यावेळी सरपंच मुकेश गडेकर यांनी केली.
विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे चेअरमन गणेश शेटगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले मोरजी पंचायत मार्फत हायस्कूलला सदोदित सहकार्य मिळत आहे. पंचायतीने या हायस्कूलसाठी योग्य पद्धतीने मदत केल्याबद्दल समाधान व्यक्त करून हायस्कूल साठी क्रीडा मैदान नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात .त्या अडचणी दूर करण्यासाठी पंचायतीने ही प्रयत्न करावे. व्यवस्थापन समिती ही कार्यरत आहे .क्रीडांगणाबरबरच साधन सुविधांचा अभाव असतो. तो अभाव दूर करण्यासाठी आम्हीही सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे गणेश शेटगावकर यांनी सांगितले.