आताच शेअर करा

बांदा: प्रतिनिधि

दिनांक : १४ ऑगस्ट २०२४

निगुडे गावातील आजी/माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, पुढारी, नेते मंडळी, गावातील महिला/पुरुष यांना कळकळीची विनंती करण्यात येते की, उद्या गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय निगुडे येथे आपल्या समवेत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन तहसीलदार साहेब सावंतवाडी यांना दिलेले आहे. सदर निवेदनात आपल्या गावच्या  सिमेलगत सोनुर्ली,व्यत्ये, इन्सुली, क्षेत्रफळ गावात सुरू असलेल्या क्वॉरी/ क्रशर वरुन गावातून भरधाव होणारी ओव्हर लोड खनिज वाहतूक बंद करणे. ब्लास्टिंग मुळे गावातील १५६ घरांना तडे जाऊन नुकसान झाले आहे त्याची नुकसानभरपाई मिळणे. रात्री अपरात्री होणरे बोअर ब्लास्टिंग बंद करणे. अशा प्रमुख मागण्या आहेत. भविष्यात आपल्या गावाला या क्वॉरी/क्रशर मुळे एक ना अनेक अशा भयंकर समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्याच्यावर आत्ताच उपाय शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. प्रशासनाला आपली एकजूट दाखविण्यासाठी उद्याच्या उपोषणाला सर्वांनी उपस्थित राहून आमच्या वरील मागण्यांची पूर्तता  करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू असे निगुडे सरपंच म्हणाले हे उपोषण पार पाडण्यासाठी गावातली सर्व महीला पुरुष एकत्रित येवून प्रशासनाला एक जुठ दाखवून धारेवर धरणे गरजेचे आहे उपोषणातील सबंधित प्रश्नांना मार्गी लावू असेही म्हणाले. तसेच  सदर उपोषण कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात येईल याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी असेही  म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *