
वाफोली विकास सोसायटी बँक व सस्था स्थरावर विभागात अव्वल
सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनांक : १५ जुलै २०२४
सावंतवाडी तालुक्यातील वाफोली विकास सोसायटी बँक व संस्था पातळीवर विभागात १०० टक्के वसुली करत अव्वल स्थानी झेप घेतली.यासाठी चेअरमन,व्हा.चेअरमन,सचिव,सर्व सभासद यांचा मोलाचा वाटा आहे.कालच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून ‘ प्राथमिक विकास संस्था संवाद कार्यक्रम संपन्न झाला आहे.यावेळी सावंतवाडी तालुक्यातील १०० टक्के वसुली केलेल्या १६ संस्थांचा गौरव करण्यात आला.गौरव सोहळा प्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग,रवींद्र मडगावकर,गजानन गावडे,विद्याधर परब,बँकेचे माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर,सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे,जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,क्षेत्र वसुली उपसरव्यवस्थापक दत्ताराम गावडे,कर्ज विभाग प्रमुख के.बी.वरक.संगणक संस्था प्रमुख वसंत हडकर,तालुका विकास अधिकारी व्ही.डोर्लेकर,विकास अधिकारी संजय आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते वाफोली विकास सोसायटी पदाधिकारी यांचा शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला.या शुभप्रसंगी वाफोली विकास संस्थेचे चेअरमन धनश्री विलास गवस,व्हा.चेअरमन अनिल गवस,सचिव सुधा परब,मारुती गवस,मंथन गवस,ज्ञानेश्वर ठाकूर,दशरथ आईर,चंद्रकांत आईर उपस्थित होते.यावेळी विकास संस्थांनी कर्ज पुरवठा व वसुली अशा सर्वच बाबतीत आघाडीवर राहावे.असे आवाहन यावेळी मनीष दळवी यांनी केले आहे.
