आताच शेअर करा

झाडाच्या चपाट्यात विद्युत तारा सापडल्याने जमीन दोस्त झाला विजेचा खांब

सिंधुदूर्ग: संपादकीय

दिनांक:१५ जुलै २०२४


शनिवार-रविवार दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोंडुरा-दांडेली मार्गावरील कोंडुरा हायस्कूल जवळ रस्त्यावर भले मोठे झाड कोसळले. यावेळी एक वीजखांब व विद्युत ताराही जमीनदोस्त झाल्या. शाळेला सुट्टी असल्याने तसेच त्या दरम्यान येथून कोणतीही वाहतूक नसल्याने अनर्थ टळला. मात्र वीज खात्याचे नुकसान झाले.
गेले दोन दिवस सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. बांदा शिरोडा मार्गावरील दांडेली बनवाडी येथे अनेक बागायतींना पाण्याने वेढा घातला. तसेच तळवणे येथेही बागायतीत पुराचे पाणी शिरले.  काही ठिकाणी लागवड केलेली झाडे उन्मळून पडली. तर दांडेलीत दोन ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली.
कोंडुरा तीठा येथे दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास वादळी पावसामुळे अकाशीयाचे मोठे झाड विद्युत वाहिनीसह रस्त्यावर कोसळले. यावेळी एक विद्युत खांब जमीनदोस्त झाला. ग्रामस्थांनी याची माहिती तत्काळ वीज वितरण विभागात देऊन पुरवठा खंडित करण्यास सांगितले. यावेळी येथून कोणतीही वाहतूक होत नसल्याने अनर्थ टळला. ग्रामस्थांनी झाड हटविले व मार्ग मोकळा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *